गुरुवार, १७ जून, २०२१

HRIF व ACFI च्या वतीने महावितरण मधील कर्मचाऱ्यांना व नागरिकांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याच्या आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप.


 इचलकरंजी : कोरोना सांसर्गीक रोगा विरूध्दचा  सामना आपण जिंकणार आहोत, त्यासाठी मास्क वापरणे, दोन हात दूरीचे शारीरिक अंतर राखणे, सँनिटायझर  वापरणे, हात स्वच्छ धुणे, गर्दी न करणे हे नियम पाळण्याबरोबर रोग प्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचे असून, त्यासाठी होमियोपँथिचे आर्सेनिक अल्बम च्या गोळ्या श्री श्री होमिओ किलनीक इचलकरंजी यांच्याकडुन उपलब्ध करून अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया व हुमन राइट्स इंटरनॅशनल फेडरेशन यांच्या वतीने महावितरण मधील अधिकारी व कर्मचारी वर्गाला  गोळ्यांचे वाटप करण्यात आले. 
तसेच भागातील नागरिकना देखील गोळ्यांचे वाटप करण्यात आले .यावेळी अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया चे कोल्हापुरजिल्हा समन्वयक  व हुमन राइट्स इंटरनॅशनल फेडरेशनचे महाराष्ट्र  राज्य सचांलक   रणजीत म्हेतर व सामाजिक कार्यकर्त संदीप पाटील,गौरव म्हेतर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शुक्रवार, ११ जून, २०२१

चतुर्थ वार्षिक कर आकारणीची कार्यवाही थांबविण्याचे नगराध्यक्षा अ‍ॅड. सौ. अलका स्वामी यांच्या सुचना

इचलकरंजी - कोरोनाचा वाढता संसर्ग, निर्माण झालेली परिस्थिती आणि धोका वाढण्याची शक्यता याचा सारासार विचार करुन इचलकरंजी नगरपरिषदेच्यावतीने चतुर्थ वार्षिक कर कर आकारणीसाठी हाती घेण्यात आलेल्या मालमत्तांच्या सर्व्हेक्षणाचे काम थांबविण्याचे आदेश नगराध्यक्षा अ‍ॅड. सौ. अलका स्वामी यांनी दिले आहेत.
नगरपरिषदेच्यावतीने दर चार वर्षांनी शहरातील मालमत्ताधारकांच्या मिळकतीचे सर्व्हेक्षण करुन त्यानुसार कर आकारणी केली जाते. गतवर्षी कोरोना महामारीमुळे नगरपरिषदेच्यावतीने केले जाणारे चतुर्थ वार्षिक कर आकारणीचे काम स्थगित ठेवण्यात आले होते. त्यामुळे सन 2021-22 ते 2024-25 सालासाठीच्या कर आकारणीसाठी मालमत्तांच्या सर्व्हेक्षणाचे काम हाती घेऊन त्यासाठी कर्मचार्‍यांची नियुक्तीही केली होती. या संदर्भात शुक्रवारी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी व उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांच्यावतीने शहरातील सद्यस्थितीचा विचार करुन सर्व्हेक्षणाचे काम थांबविण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. याची दखल घेत नगराध्यक्षा सौ. स्वामी यांनी या कामासंदर्भात मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्याशी चर्चा केली.
इचलकरंजी शहर हे कामगारांचे शहर असून शहरात मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे वस्त्रोद्योगासह सर्वच औद्योगिक क्षेत्र ठप्प झाले असून सर्वांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या संपूर्ण परिस्थितीचा विचार करुन मालमत्तांच्या सर्व्हेक्षणाचे काम थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला.  या संदर्भात सर्वपक्षीय बैठक घेऊन चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. तोपर्यंत चतुर्थ वार्षिक कर आकारणीसाठी सर्व्हेक्षणाचे काम थांबविण्यात येत असून त्या संदर्भात संबंधित विभागप्रमुखांना सूचना केल्या असल्याचे नगराध्यक्षा सौ. स्वामी यांनी सांगितले.

गुरुवार, १० जून, २०२१

इचलकरंजी शहरातील घंटा गाडीच्या माध्यमातून कचरा उठावाचे काम सक्षमपणे करणेचे उपनगराध्यक्ष श्री.तानाजी पोवार यांचे आदेश.

इचलकरंजी शहरातील घंटा गाडीच्या माध्यमातून कचरा उठावाचे काम सक्षमपणे करणेचे उपनगराध्यक्ष तथा पक्षप्रतोद..भा.ज.पा..श्री.तानाजी पोवार यांचे आदेश.
 
इचलकरंजी शहरात प्रत्येक प्रभागांनुसार घंटागाडीच्या माध्यमातून "आदर्श फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्विस" या कंपणीद्वारे कचरा उठावाचे काम सुरू आहे. सदर कामाबद्दल बहुतांश पदाधिकारी..नगरसेवक..
नगसेविकांच्या विविध प्रकारच्या तक्रारी येत असल्याने
आज दि.१० जून रोजी उपनगराध्यक्ष श्री.तानाजी पोवार
यांनी मुख्याधिकारी.इ.न.पा. डॉ.श्री.प्रदीप ठेंगल
आणि पदाधिकारी नगरसेवक यांच्या समवेत सदर कंपनीचे प्रतिनिधी,आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कंपनीचे सुपर वायझर यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पदाधिकारी आणि नगरसेवक यांनी या कामा बद्दल अनेक तक्रारी उपस्थित केल्या, याप्रश्नी
मुख्याधिकारी डॉ.प्रदीप ठेंगल  यांनी करारानुसार काम करणेच्या सुचना दिल्या. यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक घरातून कचरा उचलणे.पॉईंट वरून कचरा उचलणे इत्यादी बाबींचा समावेश आहे.याचबरोबर नगरपरिषद आरोग्य विभागाकडील यंत्रणेचा पुरेपूर वापर करावा व कचरा डेपोवर वाहतुकीची सुविधा करणेचे आदेश दिले.त्याचबरोबर जे नागरिक घंटागाडीमध्ये कचरा न टाकता रस्त्यावर अथवा इतरत्र कचरा टाकतील त्यांचे वर कारवाई करणेचे आदेश दिले.या सर्व चर्चेअंती 
उपनगराध्यक्ष श्री.तानाजी पोवार यांनी सध्या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वच्छता अत्यंत महत्त्वाची बाब असलेने शहरातील कचरा उठावाचे काम सक्षमपणे करणेच्या सुचना दिल्या. कंपनी कडील काम करणारे सुपरवायझर..कर्मचाऱ्यांच्या विविध समस्याचे निराकरण केले.त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांच्या मध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.उपनगराध्यक्ष दालनात झालेल्या बैठकीत ज्येष्ठ नगरसेवक
श्री.प्रकाश मोरबाळे ,श्री.मदन झोरे ,नगरसेवक
श्री.मनोज हिंगमिरे,श्री.किसन शिंदे मा.नगरसेवक.
श्री.जहांगीर पट्टेकरी ,श्री.बंडोपंत मुसळे मुख्याधिकारी.इ.न.पा. डॉ.श्री.प्रदीप ठेंगल
आरोग्य अधिकारी डॉ.सुनिलदत्त संगेवार
आरोग्य विभाग प्रमुख.श्री.विश्वास हेगडे
मुख्य स्वच्छता निरीक्षक.श्री.सुर्यकांत चव्हाण
स्वच्छता निरीक्षक श्री.विजय पाटील इचलकरंजी नगरपालिका आरोग्य विभागातील स्वच्छता निरीक्षक प्रभाग अधिकारी मुकादम तसेच आदर्श फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिस तर्फे स्थानिक प्रतिनिधी मक्तेदार.इ.न.पा.श्री.राहूल गायकवाड
श्री.संतोष माने  श्री.जयपाल लोखंडे
व कंपनी कडील काम करणारे सुपरवायझर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती

107 कोटी निधीतुन इचलकरंजी शहरातील प्रभाग क्र 12 रस्ता डांबरी करण्याला सुरवात.

इचलकरंजी : मा आमदार सुरेशराव  हाळवणकर यांच्या विशेष प्रयत्नाने मंजुर झालेल्या 107 कोटी निधीतुन शहरातील प्रभाग क्र 12 जुने बस स्टँड परीसर स्पुर्तीनगर चौक जनता बॕक काॕर्नर ते जोशी हाॕस्पिटल चौक रस्ता डांबरी करण्याचा शुभारंम.
 मा आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थित त्यांच्या व  नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी (वहिनी ) यांच्या हस्ते  करण्यात आला यावेळी शिक्षण सभापती मनोजभाऊ सांळुखे, इनपा तरु समिती सदस्य सतिश भस्मे, नागुताई लोंढे, पापालाल उस्ताद , आनिल ठाणेकर अरुण कोठावळे,विजय बनसोडे,अर्जुन शिंदे,विजय सांवत,चाॕद जमादार भागातील मान्यवर जेष्ठ नागरिक उपस्थित होते. [कॅाट्रॅक्टर गुंजाटे सांगली ].

इचलकरंजी टायगर ग्रुप च्या वतीने गोशाळेत चारा वाटप

टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजीभाऊ जाधव यांचे लाडके व विश्वासू कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पै.सुशांतभाऊ कांबळे यांच्या व...