गुरुवार, १७ जून, २०२१

HRIF व ACFI च्या वतीने महावितरण मधील कर्मचाऱ्यांना व नागरिकांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याच्या आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप.


 इचलकरंजी : कोरोना सांसर्गीक रोगा विरूध्दचा  सामना आपण जिंकणार आहोत, त्यासाठी मास्क वापरणे, दोन हात दूरीचे शारीरिक अंतर राखणे, सँनिटायझर  वापरणे, हात स्वच्छ धुणे, गर्दी न करणे हे नियम पाळण्याबरोबर रोग प्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचे असून, त्यासाठी होमियोपँथिचे आर्सेनिक अल्बम च्या गोळ्या श्री श्री होमिओ किलनीक इचलकरंजी यांच्याकडुन उपलब्ध करून अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया व हुमन राइट्स इंटरनॅशनल फेडरेशन यांच्या वतीने महावितरण मधील अधिकारी व कर्मचारी वर्गाला  गोळ्यांचे वाटप करण्यात आले. 
तसेच भागातील नागरिकना देखील गोळ्यांचे वाटप करण्यात आले .यावेळी अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया चे कोल्हापुरजिल्हा समन्वयक  व हुमन राइट्स इंटरनॅशनल फेडरेशनचे महाराष्ट्र  राज्य सचांलक   रणजीत म्हेतर व सामाजिक कार्यकर्त संदीप पाटील,गौरव म्हेतर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

इचलकरंजी टायगर ग्रुप च्या वतीने गोशाळेत चारा वाटप

टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजीभाऊ जाधव यांचे लाडके व विश्वासू कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पै.सुशांतभाऊ कांबळे यांच्या व...