रविवार, २३ मे, २०२१

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंधःकार दूर करण्यासाठी धावले इचलकरंजीकर...


इचलकरंजी :
वादळाने खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर  सिंधुदुर्ग जिल्ह्यात तोक्ते चक्रीवादळाने वीज वितरण कंपनीच्या वीज वाहिन्या आणि एकूणच पायाभूत यंत्रणेचे प्रचंड नुकसान झाल्याने जिल्ह्यातील गावे अंधारात बुडाली होती . येथील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून पाचशेहून अधिक वीज वितरणचे कर्मचारी सिंधुदुर्गमध्ये दोन दिवसांपूर्वी दाखल झाले आहेत .त्यामध्ये इचलकरंजी मधून देखील टिम गेलेली आहे,तेथील तीन लाखांहून अधिक वीज ग्राहकांचा खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर करीत आहेत . दरम्यान , वीजपुरवठ्याअभावी जनजीवन विस्कळीत झाले आहे. चक्रीवादळाने तेथील २८ वीज उपकेंद्रे बंद पडली . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी इचलकरंजी टिम  कोसळलेले विद्युत खांब उभे करणे , तुटलेल्या वीज वाहिन्यांची जोडणी करणे , ट्रान्स्फॉर्मर दुरुस्त करणे काम करत आहेत .
महावितरण मधील कर्मचाराना सरकार कडुन प्रशंसा होत नाही कोरोनासारखा महामारी मध्ये कर्मचारी २४ तास वीज पुरवठा सुरळीत पणे देत  आहेत.त्यामुळे दवाखाने,पाणी पुरवठा ,दिवाबत्ती,मोबाईल चालु आहेत.पण त्यांचासाठी लस देखील मिळत नाही,त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.फ्रंटलाईन वर्करच्या दर्जा मिळत नाही.या मागणीसाठी संप करण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

इचलकरंजी टायगर ग्रुप च्या वतीने गोशाळेत चारा वाटप

टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजीभाऊ जाधव यांचे लाडके व विश्वासू कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पै.सुशांतभाऊ कांबळे यांच्या व...